वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : शहरातील सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिलेली इचलकरंजी महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना बुधवारी प्रसिद्ध झाली नाही.ती गुरुवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज प्रसिद्ध होणार होती. राज्य निवडणूक आयोग छाननी करून प्रसिद्ध करणार होते.परंतु मोठ्या महापालिकेच्या तपासनीस विलंब लागल्याने इचलकरंजी महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना बुधवारी प्रसिद्ध झाली नाही.ती उद्या गुरुवारी दुपार पर्यंत प्रसिद्ध होईल.आज प्रसिद्ध न झाल्याने इच्छुकांची निराशा झाली.
