मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील बापाचे दर्शन आमदार राहुल आवाडे यांनी घेतले

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे आणि सौ मौसमी आवाडे यांनीही आवर्जून उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी विराजमान होणाऱ्या बाप्पाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येते. यावर्षीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अनेक मंत्री आमदार आणि खासदारांना गणरायाच्या दर्शनासाठी आपल्या घरी निमंत्रित केले होते. इचलकरंजी विधानसभेचे आमदार राहुल आवाडे आणि सौ मौसमी आवाडे यांनी ही वर्षा निवासस्थानी भेट देऊन बापाचे दर्शन घेतले. यावेळी फडणवीस यांनी आमदार राहुल आवाडे यांच्या बरोबरच मंत्री शंभूराजे देसाई, खासदार, आमदार आदींच्या सोबत संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *