इचलकरंजीत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्यनमस्कार

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : २१ जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी मध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्यनमस्कार व गायत्री यज्ञ करण्यात आले आहे. संपूर्ण दिवसभर सूर्यनमस्कार घालण्याची ही शहरातील पहिलीच वेळ आहे.योगाचार्य संगु गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली महेश क्लब ऑफ इचलकरंजी मध्ये एस.एस.वाय.एस. मित्र परिवार आदी संस्थांच्या सहकार्याने शनिवारी पहाटे ६.५ पासून सूर्यनमस्कार करण्यास प्रारंभ करण्यात आला. गायत्री यज्ञही करण्यात आले. या दोन्ही उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *