संजय कपूरच्या मृत्यूनंतर संपत्तीचा वारसदार कोण?

12 जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळत असताना उद्योजक आणि करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरचं निधन झालं. अचानक घडलेल्या या घटनेनं सर्वांना धक्का बसला. खेळ सुरु असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि काही क्षणांतच ते कोसळले. तातडीने वैद्यकीय मदत घेण्यात आली, पण त्यांना वाचवता आलं नाही.

संजय कपूर यांनी वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुढील तपासणीत स्पष्ट झाले की त्यांनी चुकून मधमाशी गिळली होती, ज्यामुळे अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन झाली आणि त्यांना श्वास घेणं कठीण झालं. यामुळे तीव्र हृदयविकाराचा झटका झाला.

संजय कपूर यांनी तीन वेळा लग्न केलेलं. पहिलं नंदिता महतानीशी, दुसरं करिश्मा कपूरशी आणि शेवटचं प्रिया सचदेवशी. पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. दुसऱ्या लग्नातून त्यांना दोन मुले समायरा आणि कियान आहेत. या नात्याचा शेवट मोठ्या वादात झाला. त्यावेळी करिश्माला त्यांनी 70 कोटींची पोटगी, खारमधील घर आणि मुलांसाठी 14 कोटींचा बाँड दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *