वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात मिलिडीज पंचम या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि.१३) सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आले आहे.विनामूल्य हा कार्यक्रम रसिक श्रोत्यांसाठी ठेवण्यात आला आहे.
होगाडे जॉबर यांची ध्वनी व्यवस्था : गेली चार पिढ्या साउंड सिस्टम मध्ये उत्तम काम करणारे आणि हजारो लाईव्ह कार्यक्रम करण्याचा अनुभव असलेले एस एम होगाडे जॉबर हे साऊंड व लाईट्सची संपूर्ण जबाबदारी सांभाळणार आहेत.
आर.डी.बर्मन यांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रशांत होगाडे आणि ऋषिकेश ठाकूर-देसाई या निर्मात्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत आहे.उत्तम ध्वनी व्यवस्था आणि अत्याधुनिक लाईटच्या झोतात, नामवंत वादकांच्या संगीत साथच्या माध्यमातून निता ठाकूर-देसाई, प्रवीण होगाडे, प्रशांत होगाडे, महेश शिंदे, डॉ. दीपक कुंभार हे विविध गीते सादर करणार आहेत. याला पुण्यातील प्राजक्ता जोगळेकर या आपल्या खास शैलीत सूत्रसंचालन करणार आहेत.कार्यक्रमात विक्रम पाटील,रुत्विक कुरणे, गणेश सालोखे,धीरज वाकरेकर, सरजेराव कांबळे, स्नेहल जाधव, प्रकाश सालोखे, रोहित हनकारे, विनोद सावंत या अनुभवी वादकांचा समावेश आहे.कार्यक्रमाचे प्रायोजकाची जबाबदारी श्रीराम, काजवे फर्निचर जी एन सी इंटरप्राईजेस लिथिंग पिकनिक ब्रँड वेअर, मंच अॅड्स यांनी सांभाळली आहे.
