वस्त्रनगरी वृत्तसेवा
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय सी.पी. राधाकृष्णन यांची निवड केली.विविध राज्यांमध्ये संसद सदस्य आणि राज्यपाल म्हणून काम करताना, माननीय राज्यपाल राधाकृष्णन यांनी विविध कायदेविषयक आणि घटनात्मक बाबींमध्ये व्यापक कौशल्य मिळवले आहे. उपराष्ट्रपती जयदीप धनगर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर राधाकृष्णन यांची निवड केली आहे.

