ड्रेसकोड पर्यटनाची नवी क्रेझ

वस्त्रनगरी वृत्तपत्र / विक्रम खांडेकर

दिल दोस्ती दुनियादारी… मित्र वनव्यामध्ये गरव्यासारखा अशी वाक्ये आपल्या कानावर पडल्यास मैत्र मैत्रीच्या आठवणी नक्कीच जाग्या होतात.आणि ती जर पावसाळी पर्यटनाची आठवण असेल तर त्याची बात वेगळीच असते.अशाच आठवी जाग्या होत आहेत.पावसाळी प्रयत्नांच्या निमित्ताने.सध्या पावसाळी पर्यटनाची मोठी क्रेझ आली आहे. कार्यालयात काम करणारे कर्मचारी, महाविद्यालयीन तसेच हायस्कूलमध्ये असणारे मित्र पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडताना दिसत आहेत.गेल्या काही वर्षापासून एकसारखा ड्रेस परिधान करून पर्यटनासाठी बाहेर पडण्याची नवीन क्रेझ आली आहे.वास्तविक या माध्यमातून मैत्रीतील एकोपा टिकवण्याचा प्रयत्न तर होतोच त्याच बरोबर पावसाळी पर्यटन ही अनुभवता येते. विशेष म्हणजे एकच गणवेश घातल्याने एकसंघपणा दिसून येतो. सध्या एक सारखा गणवेश घेण्याची क्रेज रूढ होताना दिसत आहे.

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना संख्या वाढली.

कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा,पन्हाळा,गगनबावडा,पळसंबा,पन्हाळा,मसाई पठार आदी ठिकाणे,तसेच मानोली,राऊतवाडी,पालेश्वर,बरकी हे धबधबे पाहण्यासाठी युवा बाहेर पडताना दिसत आहेत.जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता रिसॉर्ट सुरू झाले असून त्याठिकाणी राहण्याची आणि सकाळच्या चहा पासून सायंकाळच्या जेवणापर्यंत ची सोय असते.आशा रिसॉर्टला ही भ्रमंती करण्यासाठी बाहेर पडलेल्या व्यक्ती पसंती देताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *