वस्त्रनगरी वृत्तपत्र / विक्रम खांडेकर
कबनूर : प्रतिवर्षाप्रमाणे श्री विठ्ठल बिरदेव मंदीर देवस्थान श्री क्षेत्र पट्टणकोडोली यांची पायी दिंडी चे पंढरपूरसाठी प्रस्थान झाले.त्या दिंडीचे आगमन कबनूर मध्ये झाल्यानंतर येथील सत्यराज मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या दिंडीचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी ट्रस्टतर्फे दिंडीतील वारकऱ्यांना दूध व केळी वाटप करण्यात आले. या उपक्रमात अनिकेत लोखंडे, अमोल खांडेकर, पंकज धनगर, आशिष पाटील, दीपक पाटील, उदय मस्के, अजय आडके, अमोल सुतार, चंद्रकांत तारळेकर, आनंदा धनगर, किरण शिंदे, विनायक भोसले, विजय भोसले, स्वप्निल भोसले, संतोष पाटील, अक्षय पाटील, ज्योतीराम खामकर, संदीप काळगुडे, अमोल कारंडे तसेच ट्रस्टचे सर्व सभासद उपस्थित होते. दिंडीतील वारकऱ्यांनी कबनूर ग्रामस्थ व ट्रस्टने केलेल्या स्वागताने भारावून गेले. पायी दिंडी पुढे मार्गस्थ झाली.

