वस्त्रनगरी वृत्तपत्र / विक्रम खांडेकर
कबनूर : इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर गावात सध्या मोठ्या समस्येला गावकरी सामोरे जात आहेत. सुमारे 70 ते 75 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात आजपर्यंत एकही सार्वजनिक मुतारी किंवा सार्वजनिक शौचालय सहजासहज नजरेत पडत नाही. एक शौचालय आहे मात्र कायम अस्वच्छतेने घेरलेले असते त्यामुळे गावातील नागरिकांना तसेच गावात येणाऱ्या बाहेरील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मुतारीच्या व शौचालयाच्या अभावामुळे गावातील अनेक लोकांना उघड्यावर लघुशंका आणि शौचालयासाठी जावे लागते. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून आरोग्यावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. बाहेरून येणारे नागरिक, महिला, लहान मुले यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
