वस्त्रनगरी वृत्तसेवा/ विक्रम खांडेकर
इचलकरंजी : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या समाधी महोत्सवानिमित्त इचलकरंजी व परिसरातील आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे हे 35 वे वर्ष असून रविवार 6 जुलै पासून या स्पर्धांना प्रारंभ होणार आहे.श्री नामदेव महाराजांच्या समाधी महोत्सवनिमित्त प्रतिवर्षी श्री नामदेव समाज सेवा मंडळ व श्री संत नामदेव युवक संघटना यांच्यावतीने आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. १ ली ते १० तील विविध गटात चित्रकला, सामान्यज्ञान, निबंध,बुध्दिबळ, वक्तृत्व , पाठांतर, गायन,वेशभूषा स्पर्धा होणार आहेत.सदर स्पर्धा मध्ये सहभागी होण्यासाठी नामदेव भवन,दाते मळा या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
