वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : श्रींच्या विसर्जनानिमित्त येणाऱ्या गणेश भक्तांचे स्वागत व गणरायाला निरोप देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्वतंत्र व्यासपीठ शहर जिल्हाध्यक्ष सुहास अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा चौकात उभारण्यात येणार आहे.
बाप्पा च्या विसर्जनासाठी शहरातील शिवतीर्थ ते नदिवेस नका या दरम्यान व्यासपीठ उभारून श्रींच्या विसर्जनानिमित्त येणाऱ्या गणेश भक्तांचे स्वागत व गणरायाला निरोप देण्याची शहरात प्रथा आहे.त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आणि साजिक संघटना यांच्या कडून व्यासपीठ उभारले जाते.या वर्षी शहर जिल्हाध्यक्ष सुहास अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा चौकात व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. तिथे मंडळांचा सत्कार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अशोकराव जांभळे, जेष्ठ नेते धोंडीलालजी शिरगावे , ज्येष्ठ नगरसेवक लतीफ गैबान, व्यापारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी, युवक प्रदेश सचिव परवेज गैबान, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर, उद्योगपती उदय लोखंडे तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीचे सदस्य आदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.यासाठी आपल्या कार्यकर्त्यानी स्टेजवर सकाळी 9 वाजल्यापासून गणेश विसर्जन संपेपर्यंत उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजीचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास अशोकराव जांभळे व कार्याध्यक्ष अमित सुरेशराव गाताडे यांनी केले आहे.
