डी के ए एस सी महाविद्यालयाच्या जलतरण व तायक्वांदो खेळाडूंचे यश

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शासकीय तायक्वांदो व स्विमिंग स्पर्धा राजीव गांधी भवन व शंकरराव पुजारी जलतरण तलाव इचलकरंजी या ठिकाणी उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाल्या.

जलतरण स्पर्धेमध्ये सई शिंदे या खेळाडूने 50 मी फ्री स्टाइल, 50 मी बॅक स्ट्रोक व 100 मी बॅक स्ट्रोक खेळ प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला व तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्याचप्रमाणे तायक्वांदो खेळामध्ये हर्षदा पुजारी 52 ते 56 वजन गटामध्ये प्रथम क्रमांक व ज्ञानदा पुजारी 48 ते 52 वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला व यांची देखील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

खेळाडूंच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के खाडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच प्राचार्यांनी खेळाडू विविध खेळात करत असलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलेखेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.विनायक भोई, प्रा. मुजफ्फर लगीवाले व प्रबंधक श्री आर बी जोग यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचा प्राध्यापक स्टाफ, प्रशासकीय स्टाफ व विद्यार्थी विद्यार्थिनींनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *