कोल्हापूर जिल्हा शालेय जलतरण स्पर्धांना प्रारंभ

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर व जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर आयोजित कोल्हापूर जिल्हा शालेय शासकीय जलतरण स्पर्धेचा शुभारंभ इचलकरंजीतील शंकररराव पुजारी जलतरण तलाव येथे करण्यात आला. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील १२ तालुक्यातून जलतरणपटू सहभागी झाले आहेत.या स्पर्धेचा शुभारंभ ज्येष्ठ क्रीडा संघटक तथा डीकेटीई संस्थेचे विश्वस्त चंद्रशेखर शहा यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी इचलकरंजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक नंदकुमार गाडेकर होते. तर इचलकरंजी महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.क्रीडाशिक्षक संभाजी बंडगर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे चंद्रशेखर शहा यांनी, इचलकरंजी व कोल्हापूर जिल्ह्याचा जलरतण क्षेत्रात दबदबा असल्याचा उल्लेख करत प्रत्येक क्रीडा स्पर्धेसाठी इचलकरंजीकरांकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा विकास अधिकारी अजिंक्य चौगुले, जिल्हा जलतरण संघटनेचे ट्रेझरर अजय फाटक, स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशिक्षक विजय गुरव, ज्येष्ठ जलतरण प्रशिक्षक गंगाराम बरगे, जलतरणचे एन. आय. एस. कोच संदीप पाटील, उदय निंबाळकर, राजेंद्र पन्हाळकर, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे गौरव खामकर, क्रीडाशिक्षक सुभाष माने, गणेश बरगाले, राहुल कुलकर्णी यांच्यासह पंच, प्रशिक्षक, स्पर्धक, पालक उपस्थित होते. क्रीडा शिक्षक सुभाष माने यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *