राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सान्वी पोवळे हिला कास्य पदक

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : अहिल्यानगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत येथील व्यंकटराव हायस्कुलची विद्यार्थीनी सान्वी विजय पोवळे हिने ऱ्हिद‌मिक पेअर या प्रकारात कास्य पदक मिळविले. सान्वी हिने यापूर्वीही विविध योगा स्पर्धांमध्ये उज्वल यश प्राप्त केले आहे.

महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोशिएशन व बृहन महाराष्ट्र परिषद यांच्या वतीने अहिल्यानगर येथे ६ वी राज्यस्तरीय योगासन स्पर्धा पार पडली. यामध्ये १४ ते १८ वर्षे वयोगटात मुलींमध्ये सान्वी पोवळे हिने कास्य पदक मिळविले. तिला योगप्रशिक्षक सुहास पवळे यांचे मार्गदर्शन लाभले. तर आई-वडील व प्रशालेतील शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले. तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *