फेमिना मिस इंडिया रनर्स-अप यांनी शिवराजपूर बीचची सागरी शोभा अनुभवल

वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे

मुंबई : गुजरातमधील पहिला ब्लू फ्लॅग प्रमाणित शिवराजपूर समुद्रकिनारा येथे त्या वेळी खास उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, जेव्हा फेमिना मिस इंडिया २०२३ च्या फर्स्ट रनर-अप श्रेया पूंजा आणि 2024 च्या फर्स्ट रनर-अप रेखा पांडे यांनी येथे भेट देत किनाऱ्याचे सौंदर्य जवळून अनुभवले.

पवित्र नगरी द्वारका जवळ वसलेला शिवराजपूर बीच स्वच्छ वाळू, नितळ पाणी आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनासाठी ओळखला जातो. येथे शांतता आणि साहस यांचा सुंदर समतोल पाहायला मिळतो. अरबी समुद्राच्या लाटांवर धावणाऱ्या जेट-स्की आणि क्षितिजापर्यंत पसरलेला निळाशार समुद्र पर्यटकांना वेगळाच अनुभव देतो.

रेखा पांडे म्हणाल्या, “येथील ऊर्जा खूप सकारात्मक आहे. अॅडव्हेंचरचा रोमांच आहे, पण सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते. भविष्यात येथे बीच कॉन्सर्ट किंवा सांस्कृतिक कार्यक्रम झाले तर ते अप्रतिम ठरतील.

”या किनाऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे स्थान. बेट द्वारकाआणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध माधवपूर यांच्या जवळ असल्याने पर्यटकांना अध्यात्म आणि पर्यटनाचा दुहेरी लाभ मिळतो. तसेच सुदर्शन सेतू मुळे ये-जा अधिक सुलभ झाली आहे.श्रेया पूंजा म्हणाल्या, “भारतामध्ये इतका स्वच्छ आणि प्रशस्त समुद्रकिनारा क्वचितच पाहायला मिळतो. शिवराजपूरचा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल आहे.”सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात न्हालेला शिवराजपूर बीच आज गुजरातच्या किनारी पर्यटनाची नवी ओळख बनत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *