हनिमूनसाठी मेघालयात गेलेल्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशीचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यात सोनम रघुवंशी आणि राजा दिसत आहेत. एक पर्यटक व्हिडीओ बनवत असताना राजा आणि सोनम समोरून येताना दिसतात. त्यात सोनम पुढे, तर राजा पाठीमागे चालताना दिसत आहे.
सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांचा हा व्हिडीओ मेघालयात फिरत असतानाचा आहे. देवसिंग या व्यक्तीने फिरत असताना व्हिडीओ शूट केला. त्यात सोनम आणि राजा हे दोघेही त्याच्या समोरून जाताना दिसत आहे.
योगायोगाने कॅमेऱ्यात कैद झालेल्या सोनम आणि राजाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. २३ मे रोजी मी मेघालयातील डबल डेकर रूट ब्रिजवर जात होतो आणि व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. काल मी व्हिडीओ बघत होतो आणि मला इंदूरमधील जोडपे रेकॉर्ड झाल्याचे दिसले. ती सकाळची ९.४५ वाजेदरम्यानची वेळ होती. आम्ही खाली जात होतो आणि नोगरिएट गावात मुक्काम केल्यानंतर कपल वर जात होते.
