माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नात सून जयश्री पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते व उच्चतंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. जयश्री पाटील या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष व स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि खासदार विशाल पाटील यांच्या वहिनी आहेत. मंत्री चंद्रकांत पाटलांनी, जयश्री पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेत, चर्चा करत पक्षप्रवेश केला. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्ष प्रवेश होणार असल्याचे चंद्रकांत पाटलांनी जाहीर केले. विधानसभा निवडणुकीमध्ये जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत लढवली निवडणूक होती. काँग्रेस पक्षाकडून जयश्री पाटील यांना पक्षातून निलंबित करण्यात आला होते.
सांगलीतील वसंतदादा घराण्याने धरली भाजपाची वाट
