वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे
मुंबई : प पू विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या माटुंगा लेबर कॅम्प येथे भीम जयंती नरसिमुलु फ्रेंड्स सर्कल यांच्या वतीने 135 वी भीम जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली .

सर्वप्रथम युवराज सरतापे गुरुजी यांनी त्रिशरन , धम्म वंदना घेतली . त्यानंतर त्यांनी प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय आणि शिक्षणासाठी काय काय हाल सोसावे लागले व त्यातून त्यानी कसा मार्ग काढून उच्च शिक्षण घेतले याची माहिती दिली . यावेळी वार्ड क्रमांक 189 च्या लोकप्रिय आणि कार्यक्षम नगरसेविका हर्शलाताइ आशिष मोरे यांनी समाजप्रबोधनपर भाषण केले .

यावेळी बोलताना हर्षलाताइ म्हणाल्या की डॉ आंबेडकरांनी दिलेला मंत्र म्हणजे शिका ,संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा अंगीकारला पाहिजे .शिक्षण म्हणजे समाज सुधारणेचा पाया असून तो तरुणांनी शिक्षण घेवून भक्कम केला पाहिजे.

यावेळी पँथर विजय सरतापे ,रमेश काळे तसेच बौद्धाचार्य युवराज सरतापे यांना नगरसेविका हर्षलाताइ आशिष मोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .नगरसेविका हर्षलाताइचा सत्कार नर्सिमुलु फ्रेंड्स सर्कल चे अध्यक्ष बाबासाहेब लोंढे यांनी केला .या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सिद्धेश गुरम ,उदय साळवी , राजू पंडित विजय सरतापे ,अनिल भंडारे , कन्नन सेल्वकुमर ,उत्कर्ष दाहिजे ,बबन थोरात , जॉन सांगळे राजगुरू पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

