वस्त्रनगरी वृत्तसेवा/बाबा लोंढे
मुंबई : अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल अशी लोकप्रिय चित्रपट अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृता कायम विविध भूमिका मधून काम करताना दिसते पण आता अमृता एका बड्या ब्रँड सोबत काम करताना दिसणार आहे. अमृताची मेडिमिक्स आयुर्वेदाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नुकतीच अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. भारतातल्या सगळ्यात उत्तम स्किन केअर ब्रँड ओळखल्या जाणाऱ्या या ब्रँड सोबत ती जोडली गेली आहे.

अमृता ही कायम योगा आणि आयुर्वेदिक गोष्टीवर विश्वास ठेवून स्वतःच्या हेल्थची काळजी घेताना दिसते आणि अश्यातच ती या ब्रँडची नवा चेहरा बनली आहे. मेडिमिक्सने अमृताच ब्रँडचा नवीन चेहरा म्हणून जंगी स्वागत केलं सोबतीला आणि जुन्या आयुर्वेदिक ज्ञाना सोबत अमृता सारखा आधुनिक चेहरा या ब्रँड सोबत जोडला गेला आहे.रुपेरी पडद्यावर काम करण्यापासून ते मेडीमिक्स सारख्या बड्या ब्रँडची ओळख आता अमृता जपणार आहे. येणाऱ्या काळात अमृता अनेक आगामी चित्रपट आणि ओटीटी प्रकल्पांमध्ये देखील दिसणार आहे आणि प्रेक्षकांना देखील त्याची उत्सुकता आहे.
मेडिमिक्स माझ्या घराचा एक भाग

“मी नेहमीच आयुर्वेद आणि नैसर्गिक गोष्टीवर विश्वास ठेवणारी आहे. मेडिमिक्स लहानपणापासूनच माझ्या घराचा एक भाग आहे आणि आता या प्रतिष्ठित ब्रँडचे प्रतिनिधित्व करणे हा एक सुंदर संपूर्ण क्षण आहे. मेडिमिक्स कुटुंबाचा भाग असल्याचा मला खरोखरच अभिमान वाटतो”असे अमृताने सांगितले.
