इचलकरंजीत आज रंगणार “ नक्षत्रांचे देणे दिपसंध्या “ कार्यक्रम

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह मध्ये दिवाळी निमित्त रविवार १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता “ नक्षत्रांचे देणे दिपसंध्या “ मराठी गीत संगीताची सुरेल मैफिल” कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे.

अविनाश सूर्यवंशी हे या कार्यक्रमाचे निर्माते असून गायक मुकुंद चौगुले हे प्रस्तुतकर्ते आहेत. अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था, नेत्रदीपक नेपथ्य, प्रकाश योजना अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या कार्यक्रमातून मराठीतील निवडक लोकप्रिय गीतांचे सादरीकरण होणार असून एक रम्य अशी दिप संध्या रसिक श्रोत्यांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. विविध कार्यक्रमांच्या उत्तुंग यशानंतर निर्माते अविनाश सूर्यवंशी व प्रस्तुतकर्ते मुकुंद चौगुले या जोडीचा हा २४ वा कार्यक्रम होत आहे.

भावस्पर्शी अशा गीत रचनांवर गायक मुकुंद चौगुले व गायिका सौ. नीता ठाकूर-देसाई हे स्वरसाज चढविणार आहेत. त्यांना सह गायिका स्नेहा संकपाळ ह्या साथ करणार आहेत. रिदम ऋतिक कुरणे, विश्वनाथ चौगुले, रमजान बालेखान, सर्जेराव कांबळे, हार्मनी संग्राम कांबळे, बासरी डॉ. सचिन जगताप यांची साथ संगत असणार आहे. निवेदक साहिल शेख हे आहेत. ध्वनी व्यवस्था व प्रकाश योजना प्रशांत होगाडे (होगाडे जॉबर) व ऋषिकेष ठाकूर-देसाई,

सदरच्या कार्यक्रमासाठी विनामुल्य प्रवेश असून दिवाळी निमित्त विशेष आयोजित केलेल्या या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटावा, असे आवाहन निर्माते अविनाश सूर्यवंशी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *