मराठी चित्रपटसृष्टीसाठी मा . ॲड. आशिष शेलार साहेब यांचा ऐतिहासिक निर्णय…!

वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. ॲड. आशिष शेलार साहेब यांनी मराठी चित्रपट निर्मात्यांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

करोना कालावधीत “अनुदान अपात्र” ठरलेल्या मराठी चित्रपटांना प्रत्येकी रुपये ५ लाखांचे विशेष अनुदान देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला असून, हे अनुदान लवकरच मुंबई येथे मा. ॲड. आशिष शेलार साहेब (सांस्कृतिक कार्य मंत्री) यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.

मराठी चित्रपट निर्मात्यांना नवसंजीवनी मिळावी यासाठी भाजपा चित्रपट युनियन यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा सकारात्मक निर्णय शक्य झाला आहे.मा.श्री. संजयजी केणेकर साहेब (आमदार), मा. विजय सरोज (प्रभारी, भाजपा सांस्कृतिक विभाग)मा . देविदास कुलकर्णी साहेब, मा. मोहनीश जगताप साहेब, मा. राजकुमार वाघ साहेब मा . संदीप जी घुगे साहेब यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.

याकरीता मा. डॉ. किरण कुलकर्णी (सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग), मा. स्वाती म्हसे पाटील (व्यवस्थापकीय संचालिका, फिल्म सिटी), मा. प्रशांत साजणीकर (सहव्यवस्थापकीय संचालक, फिल्म सिटी)मा . महेशजी वाव्हळ सर, उपसचिव, सांस्कृतिक कार्य तसेच संबंधित सर्व अधिकारी यांचे तमाम मराठी चित्रपट निर्मात्यांकडून अभिनंदन आणि आभार…!

मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देणारा हा निर्णय स्वागतार्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *