कोळ्यांची सुन लवकरच रुपेरी पडद्यावर

वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे

मुंबई : कोळी समाजातील प्रसिध्द असलेली कोळ्यांची सुन श्रद्धा कासकर या लवकरच रुपेरी पडद्यावर चमकणार आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या श्रद्धा कासकर यांनी नुकतेच श्रद्धा फिल्म्स च्या नावाने प्रॉडक्शन हाउस सुरू केले असून याद्वारे त्या चित्रपट ,वेब मालिका आणि वीडियो अल्बम ची निर्मिती करणार आहेत. सद्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू असून मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम लेखक – दिग्दर्शक हे काम करत असून एप्रिल एन्ड ला रेकॉर्डिंग ने मुहूर्त करण्यात येईल अशी माहिती श्रद्धा कासकर यांनी दिली . या चित्रपटात तुम्ही असणार आहात काय असे विचारले असता त्या स्माइल देत म्हणाल्या की यांची प्रेस लवकरच होईल व त्यामध्ये सर्व गोष्टी क्लियर होतील तोपर्यंत वाट पाहावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *