वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी (आण्णा) यांचा १ एप्रिल रोजी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहपूर्ण आणि समाजाभिमुख वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि गरजू घटकांना मदत या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवत दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवस केवळ औपचारिक न राहता समाजहिताचे उपक्रम राबवून सकारात्मक संदेश देण्याची प्रेरणादायी परंपरा यंदाही जपण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून करण्यात आली. अरुण विद्यामंदिर संग्राम बालवाडी येथे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका अँड. सौ. अलका स्वामी वहिनी, शकुंतला स्वामी (आऊ) माजी नगरसेवक दिलीप मुथा व इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ व भोजन वाटप करण्यात आले. बालकांच्या आरोग्यदायी सवयी विकसित व्हाव्यात या उद्देशाने टूथपेस्ट व टूथब्रशचे वितरण सौ अमृता स्वामी सौ मानसा स्वामी व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यानंतर डॉ. कार्तिक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी तसेच पालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच नारायणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरालाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तपासणीनंतर आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.स्टेशन रोड येथील मँचेस्टर वाळू डेपो परिसरात जय भीम नगर ग्रुप यांच्या वतीने नागरिकांना सरबत वाटप करण्यात आले. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देणारा हा उपक्रम ठरला.

हुपरी येथील व्यंकटेश सूतगिरणी येथे कामगारांना अल्पोपहार वाटप करण्यात आले, ज्यामुळे कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.कोरोची येथील वात्सल्य वृद्धाश्रम येथे किचन बांधकामासाठी आर्थिक मदत देण्यात आली. हा उपक्रम माजी अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र काणे व मित्रमंडळ यांच्या सहकार्याने पार पडला. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शुभम केसरवाणी ग्रुप यांच्या वतीने कलानगर येथील गोशाळेत गायींना चारा देऊन पशुप्रेम व संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

सामाजिक जाणिवा जोपासणारे हे उपक्रम समाजासाठी आदर्श ठरत असल्याचे नागरिकांनी सांगितले.सर्व कार्यक्रमांचे नियोजन अशोकराव स्वामी विचारमंच व संग्राम स्वामी युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक सेवा या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणादायी परंपरा कायम राखत समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी राहुल जानवेकर अरुण बंडगर संग्राम स्वामी आकाश स्वामी सौ सुवर्णा स्वामी डॉक्टर निकिता स्वामी सलीम शिकलगार महादेव स्वामी लिंगराज कित्तुरे दीपक स्वामी शिव सातपुते अविनाश वेदांते नागेश पाटील विश्वनाथ मेटे उमेश देसाई दीपक स्वामी प्रकाश चौगुले सत्यनारायण जाजु धनराज खंडेलवाल बाळासाहेब जांभळे शकील शेख ‘शिवम केशरवानी उमाकांत दाभोळे गजानन स्वामी रावसाहेब स्वामी अविनाश खोत मुन्ना स्वामी सुनील ताडे ‘रंजीत मेहतर ‘राजू सांबरे ‘यासीन नदाफ ‘मोजेस आवळे ‘रावसो स्वामी रमेश कांबळे ,संतोष स्वामी किरण स्वामी ‘ अमर जाधव अशोक पाटील ‘ राजू काळे दिगंबर सुतार ‘विनायक बोंगाळे निलेश स्वामी ‘ अक्षय स्वामी तेजस खाडे ‘ विजय पाटील सुरज स्वामी ‘ सचिन देशमाने सचिन मडिवाळ . बाबुराव स्वामी प्रविन नाईक संजय कोळी वाटे सर प्रशांत गुरव चंद्रकांत सुतार महेश खोजगे बाबासो मंडले जयसिंग वडर समस्त स्वामी मित्र मंडळ परिवार व विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सर्व उपक्रमांमधून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली असून वाढदिवस साजरा करण्याचा एक आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला.

