वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. गंगाधर माळी यांच्या हस्ते, तर लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन ताजुद्दीन खतीब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शशांक बावचकर, शहराध्यक्ष संजय कांबळे, उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल, राजन मुठाणे, नंदकिशोर जोशी, अजित मिणेकर, दिलीप भोई, योगेश कांबळे, सचिन साठे, दिलीप पाटील, लोकेश मुळे, रविंद्र पाटील, अनिल पच्छिंद्रे, ओंकार आवळकर, अब्राहम वाघमारे, प्रवीण फगारे, रमजान शिकलगार, बिस्मिल्ला गैबान यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
